Adhalarao Patil | शिवाजीदादांनी वाचला विकासकामांचा पाढा; म्हणाले, ‘माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे तर…’

उरुळी कांचन | महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत आदरणीय विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात.

यावेळी पुढे बोलताना आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) म्हणाले, राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त आदरणीय मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत. अजित दादा यांच्या मार्फत अनेक गावांना निधी मिळवून दिला आहे. खासदार नसतानाही मी 450 गावांत निधी आणला आहे. 700 गावे मी पायाला भिंगरी लावून फिरलो आहे. माझ्या लोकांच्या समस्या मी सोडविल्या आहेत. मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो,मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. मोदीजी यांच्या विचाराचा पुर्णवेळ खासदार आपल्याला विजयी करायचा आहे.

कोरोना काळात मी जीवाची पर्वा न करता माझ्या मतदार संघातील नागरिकांना आधार देण्याचे काम केले. 2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला. आमचा पराभव झाला परंतू तरीही आम्ही प्रयत्न सुरुच ठेवले. 400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही. लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो. यावेळी प्रदीप कंद, मंगलदास बांदल, अक्षय आढळराव पाटील आदींनी आपली भूमिका मांडली. महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. परिसरतील नागरिक व महायुतीच्या समर्थकांनी सभेला मोठी गर्दी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा