Priyanka Chaturvedi | ‘आदित्यचे ते फोटो बघून तरी मला खासदारकी द्या’, प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेच्या उद्धव गटाच्या नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या विधानाने महाराष्ट्रात राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी ईशान्य मुंबईतील प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबाबत तिखट वक्तव्य केल्याने शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिले आहे, माझे वडील गद्दार आहेत. कोण आहेत एकनाथ शिंदे? गद्दार. हा आवाज ठाण्यात पोहोचला पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

त्यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी खासदारकी कशी मिळवली, हे लोकांना सांगितले पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलेही कतृत्व नसताना इतकेच काय शिवसेनेशी संबंध नसताना चतुर्वेदी तुम्ही खासदारकी मिळवली. आता खासदारकीची टर्म संपत असताना तुमची जी काही तफफड सुरु आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसतेय. बुलंदी सिनेमातला एक डायलॉग आहे ‘बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मॅंह में हाथ डालने’ अशीच काहीशी परिस्थिती प्रियंका चतुर्वेदी यांची झाली आहे, अशी टीका शीतल म्हात्रेंनी केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, तुमचा काही संबध नसताना दावोसला जाऊन गुलाबी थंडीत काय केले हेही प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकांना सांगितले पाहिजे. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी गेल्या आठड्यात कोणाकोणाला भेटलात आणि स्वत:जवळ आदित्य ठाकरेंचे कसे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी मला खासदारकी द्या,असे सांगणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांनी बोलताना विचार करावा आणि भान ठेवावे, अशी वैयक्तिक पातळीवरील टीका त्यांनी यावेळी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती