Nilesh Lanke | अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट

Nilesh Lanke Meets Gaja Marne | अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला. निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांनी गुरुवारी गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट वादात पडण्याची शक्यता आहे.

खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. यामुळे यावरुन आता राजकीय वाद रंगण्याची शक्याता आहे. यापूर्वी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप