मराठा आरक्षणावर ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे हे पाहावं लागले – सुळे

 आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन घेतलं पाहिजे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

supriya sule – ४० दिवसांचा अल्टिमेटम संपून देखील आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. म्हणून जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आता यापुढे ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे हे पाहावं लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्यमंत्री यांनी सभेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात शपथ घेतली कदाचित त्यांच्याकडे मार्ग असावा. सध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसीस आहे. पॉलिसी लेवलला ते काहीच काम करताना दिसत नाही आहेत. असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

सुळे पुढे म्हणाल्या की, काल मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकलं त्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन घेऊन शब्द दिलेला आहे. आता या आरक्षणाबाबत ते काय निर्णय घेतात हे आपण पाहूया यात. आता २४ तासात ते काय निर्णय घेतात. कदाचित त्यांच्याकडे जादूची कांडी असावी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. छत्रपतींची शपथ घेऊन ते सांगत आहेत तर त्यांच्याकडे कदाचित मार्ग असावा. कदाचित २४ तासात मराठा आरक्षणाबाबत ते निर्णय घेतील मला अस वाटत असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

चंद्रशेखर बावनकुळे जरी सत्तेत असलेल्या पक्षाचे अध्यक्ष असले तरी त्यांचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच नाव घेतल्याशिवाय मावळत नाही. त्यात च सर्व उत्तर आहे. एकनाथ शिंदे बद्दल बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, भाषणाला मुद्दे नसताना देखील भाषण कारण ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी लाजिरवाणी बाबा आहे. ज्यांना २००४ मध्ये काय घडलं याचा वास्तव देखील माहिती नाही. या बाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही असे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

ललित पाटील प्रकरणाबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा हा पराभव आहे की?अजूनही याबाबत काही उघड झालेले नाही. मी गृहमंत्र्यांवर आरोप करत नसून हे सर्व समोर दिसत आहे. या सर्व गोष्टींना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. एक नागरिक एक लोकप्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनम्रपणे प्रश्न विचारत आहे की, ललित पाटील प्रकरणामधील नावे तुम्ही समोर आणणार होतात आणि त्यावेळी मी ही शब्द दिला होता की ड्रग्ज विरोधात जर तुम्ही लढाई लढणार असाल तर आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि गेले आठ ते दहा दिवस फडणवीस या सर्व प्रकरणाला टाळत आहेत. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ