कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर

Amitabh Gupta: महाराष्ट्र कारागृह विभागातील ९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत दाखविलेल्या सचोटी व कर्तव्याबद्दल यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाकरिताचे राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक जाहीर झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अहमदनगर जिल्हा कारागृहा येथील तुरुंगाधिकारी श्रेणी-१ रुकमाजी भुमन्ना नरोड, तळोजा मध्यवर्ती कारागृह येथील तुरुंगाधिकारी श्रेणी-१ सुनिल यशवंत पाटील, मुंबई मध्यवर्ती कारागृह येथील सुभेदार बळीराम पर्वत पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सुभेदार सतिश बापुराव गुंगे, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथील हवालदार सूर्यकांत पांडूरंग पाटील, येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील नामदेव संभाजी भोसले, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथील हवालदार संतोष रामनाथ जगदाळे, येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील हवालदार नवनाथ सोपान भोसले, अकोला जिल्हा कारागृह येथील हवालदार विठ्ठल श्रीराम उगले यांचा समावेश आहे.

राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक घोषित जाहीर झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे गुप्ता तसेच राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा (मु.) जालिंदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया