Prakash Ambedkar | दारूड्याची वृत्ती देशासाठी घातक, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा

Prakash Ambedkar | नरेंद्र मोदींची (Narendra Modi) वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

शेतकरी दिल्लीत उपोषणासाठी बसले होते. तेव्हा मोदी घरामध्ये विंग वाजवत बसले होते. संघाच्या कार्यकर्त्यांना मी विचारतो की, तुम्ही मानवतावाद सांगताय. हा कोणता मानवतावाद आहे की, पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायला तयार नाही, असेही त्यांनी या वेळी म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्याला नितीमत्ता नाही. कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात अशा माणसांपासून आपण सावध राहिले पाहिजे. कारण ते नुसते खासदार होत नाहीत, तर पूर्ण राज्य आपण त्याच्या हातात देत असतो, म्हणजे आपली मानगुटी आपण त्यांच्या हातात देत असतो. महाराष्ट्रातले शेतकरी नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. इथे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. जे काही इथे शेतकरी नेते उभे झाले आहेत ते शेतीमध्ये जे पिकतं त्यावर ज्या प्रक्रिया होतात त्या कारखान्यांचे ते मालक आहेत. ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत. म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे.

राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपला न मागता पाठिंबा दिला. निवडणूक होऊ नये म्हणून पाठिंबा दिला असे ते सांगत होते. निवडणूक ही या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी चौकशी होऊ नये म्हणून पाठिंबा दिला होता का नाही याचा त्यांनी खुलासा करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल