Prakash Ambedkar | भाजप देश मोठा मानता की अहंकार? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

Prakash Ambedkar | देश मोठा की अहंकार मोठा ? माझ्या दृष्टीने देश हा मोठा असतो आणि आपला अहंकार लहान असतो. आपण पाहत असाल की, आपले पंतप्रधान आपला अहंकार आधी ठेवतात आणि देशाला पाठीमागे ठेवतात अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. सातारा लोकसभेचे उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांच्या प्रचार सभेत आंबेडकर बोलत होते.

आगामी काळात धोके मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. अशा परिस्थितीत अधिकारी आणि सैनिक यांच्यात जिव्हाळ्याचे नाते असले पाहिजे. या नात्याला आता तडा जात आहे, असे मला अनेकजण सांगतात. आपण मतदानाच्या माध्यमातून शांतीपूर्ण बदल करावा असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.

ॲड. आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की, सध्याचे सरकार हे जुमलेबाज सरकार आहे. पहिल्यांदा 15 लाखाचा जुमला केला. नंतर सांगितले 2 कोटी रोजगार देऊ. पण दरवर्षी 12 लाख नोकऱ्या कमी होत आहेत, तिथेही या सरकारचे अपयश आहे. ज्या पंतप्रधानाला माणसांबद्दल जिव्हाळा नाही, त्याला पंतप्रधान करणे हा आपला गुन्हा आहे हे लक्षात घ्या. 10 वर्षे भाजपची सत्ता आहे, या दहा वर्षांत भाजपने धर्माच्या नावाने द्वेष पेरला आहे. समाजात फूट पाडण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे.

https://fb.watch/rOTwHpkLoE/

जे काम आर्मीने ईशान्य भारतात केले आहे. तेथील लोकांना आपल्यासोबत राहायचं नाही अशी भावना तिथे होती. 20 ते 30 वर्षे आर्मी तिथे राहिली, त्यांनी तिथे संबंध जोडले. त्यांची भावना पूर्णपणे बदलली. आज ते म्हणत आहेत की, आम्हाला भारतासोबत राहायचं आहे. त्यांना जोडण्याचं काम आर्मीने केले. मणिपूरच्या घटनेमुळे जुळलेली मने दुभंगली असल्याची खंत देखील त्यांनी या वेळी बोलून दाखवली.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बोलत असताना आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने मराठा आणि ओबीसींमध्ये मध्यस्थी केली नसती, सामंजस्याची भूमिका घेतली नसती, तर युद्धासारखी परिस्थिती होती. त्यावेळी इथले राजकीय नेतृत्व कोणत्या बिळात बसले होते कोणाला माहिती ?

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?