CM Eknath Shinde Meets Salman Khan | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे स्थित गेलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे आश्वासनही दिले असल्याचे समजते.
आम्ही बिश्नोईला संपवू-
सलमानच्या घरी भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :