लग्नाआधीच ‘ब्रम्हास्त्र’च्या दिग्दर्शकाने आलिया-रणबीरला दिली ‘ही’ खास भेट

मुंबई : सध्या बॉलीवूड मध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची बरीच चर्चा होत आहे. कपूर किंवा भट्ट कुटुंबातील कोणीही लग्नाच्या बातम्यांची पुष्टी दिलेली नाही, परंतु सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित छोटे-मोठे अपडेट्स समोर येत आहेत. लग्नाच्या तारखेपासून ते ठिकाणापर्यंत अनेक बातम्या समोर येत आहेत.

दरम्यान, रणबीर कपूरचा खास मित्र अयान मुखर्जीने (Ayan Mukharjee) रणबीर-आलीया व त्यांच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ (Brhamhastra) चित्रपटातील रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘केसरिया’ (Kesariya)गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आलिया सोबत रोमान्स करताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत अयान मुखर्जीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले, “रणबीर आणि आलियासाठी, तसेच लवकरच सुरू होणार्‍या पवित्र नात्यासाठी.” रणबीर आणि आलिया, माझ्या सर्वात जवळच्या आणि प्रिय व्यक्तींपैकी एक आहेत, या दोघांनीही माझ्या आयुष्यात खूप चांगले अनुभव दिले आहेत, त्यांनी आमच्या या चित्रपटासाठी स्वतःचा खूप वेळ दिला आहे. ही आमच्या केसरीया गाण्याची एक झलक आपल्या सर्वांसाठी आहे.

दरम्यान, येत्या 17 तारखेला आलिया रणबीर लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार आहेत असं सांगितले जात आहे.