Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Narendra Modi | उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गांधी कुटुंबियांवर सणसणीत टीका केली आहे. तसंच, नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ते पश्चिम बंगालच्या वर्धमान- दुर्गापूर येथे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुका लागायच्या दोन महिने आधीच मी सांगितलं होतं की, यांची सर्वांत मोठी नेता निवडणूक लढवण्याची हिंमत करणार नाही. ती घाबरून पळून जाणार. ती पळून राजस्थानात गेली आणि राजस्थानातून राज्यसभेत आली.

“मी आधीच सांगितलं होतं की शहजादे वायनाडमध्ये हरणार आहेत. आणि हरण्याच्या भितीने वायनाडमध्ये मतदान संपल्यावर ते तिसरी जागा शोधायला सुरुवात करतील. आणि आता दुसऱ्या जागेवरूनही त्यांचे चेले चपाटे म्हणत होते की अमेठी येतील, अमेठी येतील. पण अमेठीलाही इतके घाबरले की आता तिथूनही पळून ते रायबरेलीत रस्ता शोधत आहेत. फिरून फिरून ते सगळ्यांना म्हणत होते की घाबरू नका. मीही आज त्यांना म्हणतो की घाबरू नका.. पळू नका…”, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल