Ajit Pawar | “हा पठ्ठ्या ऊस नेईल अन् भाव पण चांगला देईल”, अजित पवारांनी जिंकली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनं

Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोमाने प्रचार सुरु आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सणसरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत अजित पवार बोलत आहेत.

“सोलापूर हायवे लगतच्या अनेक गावांचा प्रश्न प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला आहे. बारामती एग्रोमार्फत पुढील हंगामात ऊस घालण्याबाबत दम दिला जात असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितल आहे. ऊस न घालण्याचं कारणही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. तरीही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या, असं शेतकरी म्हणत आहेत. काही घाबरु नका, कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या ऊस न्यायला, अन् भाव पण चांगला देईल”, असं म्हणत अजित पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?