बोगस डॉक्टर्स दाखवून हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ – Kirit Somaiya

Kirit Somaiya  – संजय राऊत यांचे मित्र/ पार्टनर सुजित पाटकर (Sujit Patkar, friend/partner of Sanjay Raut) यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस (Lifeline Hospital Management Services)  या कंपनी साठी वरळी, दहिसर, शिवाजीनगर पुणे येथील जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. हजारो डॉक्टर, आया, नर्स, वॉर्ड बॉय असे बोगस स्टाफ दाखवून हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे पाप केले आहे, या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी भा. द. वि (IPC) 304 भाग 1 व 2 चा अंतर्गत गुन्हेगारी कटासाठी (Criminal Conspiracy) गुन्हे दाखल करावे अशी मागणी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया (BJP leader Dr. Kirit Somaiya) यांनी केली.

सोमैया यांनी दिलेल्या माहितीनुसार,  अंमलबजावणी संचानालयाने (ED) दाखल केलेल्या चार्जशीट (आरोपपत्र) मध्ये दहिसर, वरळी व अन्य कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट संजय राऊत यांचे मित्र, भागीदार सुजित पाटकर यांच्या अस्तित्वात नसलेल्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला कसे मिळाले याचा काळा चिठ्ठा मांडलेला आहे. या कंपनीने बोगस (Forged) कागदपत्र दाखवून व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एकूण आवश्यक संख्ये ऐवजी फक्त 25% आरोग्य कर्मचारी नियुक्त केले व बोगस कागदपत्र दाखवून महापालिकेकडून पैसे उकळले, त्यामुळे या सेंटर्स मधील हजारो रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यात आला. वेळेवर वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने काहींचे दुर्दैवी मृत्यू व अनेकांचे कायमचे नुकसान झाल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

या संदर्भात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीचे कर्मचारी यांनी अंमलबजावणी संचनालयाकडे दिलेल्या जबाबात सुजित पाटकर व अन्य पार्टनर यांनी बोगस उपस्थिती दाखवण्याचे आदेश दिले होते असे स्पष्टपणे कबूल केले आहे.

लाईफलाईन कंपनीचे मुख्य कर्मचारी श्री प्रिन्स विश्वकर्मा यांनी हे कबूल केले की दहिसर कोविड सेंटरच्या डीन डॉ दीपा श्रियान यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये दहिसर कोविड सेंटर येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागितली.

• लाईफलाईन कंपनीचे भागीदार आणि उपाध्यक्ष प्राची पार्टे यांनी श्री. विश्वकर्मा यांना सूचना दिली की ज्या लोकांनी नोकरी साठी अर्ज केला होता परंतु त्यांना कामावर ठेवले नाही/ नव्हते अश्या लोकांचे अर्ज, कागदपत्र लाईफलाईन कंपनीच्या परळ ऑफिस मध्ये आहेत ते सर्व अर्ज व कागदपत्र यांच्या छायांकित प्रती / झेरॉक्स करून हे कर्मचारी दहिसर कोविड सेंटरला कार्यरत होते म्हणून दहिसर कोबीड सेंटरच्या डीन डॉ. दीपा श्रीमान यांना द्यावे.

अंमलबजावणी संचनालयाने मुंबई महापालिकेकडून लाईफलाईन कंपनीद्वारे दहिसर वरळी/ कोविड सेंटर येथे कार्यरत 525 कर्मचाऱ्याची यादी मिळवली.

• अश्या 525 कर्मचाऱ्यांची 7 जून 2023 रोजी प्राप्त केल्यावर 9 जून 2023 रोजी या लोकांना ईडी ने पत्र पाठवले, या पैकी 141 पत्र / नोटीस पत्ता योग्य नसल्यामुळे परत आल्या.

• 525 पैकी फक्त 47 लोकांनी कर्मचाऱ्यांनी उत्तर पाठवले/ प्रतिसाद दिला. या पैकी 6 लोकाना ईडीने समन्स पाठवून बोलावले व त्यांचा जबाब नोंदवला.

 सुजित पाटकर व त्यांच्या कंपनीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोट्या प्रकाराने बोगस, फर्जी डॉक्टर व अन्य आरोग्य कर्मचारी विविध कोविड सेंटर मध्ये कार्यरत होते हे दाखवले त्याची उदाहरणे:

डॉ. प्रशांत मुक्ता दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करत होते आहे असे महापालिका व लाईफलाईन कंपनीने दाखवले, डॉ. प्रशांत मुक्ता यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये सांगितले की ते कधीही लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीत काम करत नव्हते, त्यांचे हस्ताक्षर बनावट करण्यात आले आहेत.

• डॉ. दुर्गेश मकवाना – हे पुणे यथे शिवाजीनगर कोविड सेंटर येथे कामाला होते असे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांनी दाखवले, डॉ मकवाना यांनी सांगितले की ते कधीच लाईफलाईनच्या कोणत्याही सेंटरला कामाला नव्हते. त्यांची उपस्थित व सह्या ह्या बनावट केल्या होत्या.

• डॉ. राहुल यादव हे दहिसर कांदरपाडा कोविड सेंटर येथे काम करत असल्याचे दाखवले, त्यांच्या सही देखील लाईफलाईन कंपनीने बोगस केल्या. डॉ. यादव यांनी दहिसर सेंटर येथे काही दिवस काम केल्या नंतर तिथला गैरव्यवहार लक्षात आल्याने ताबडतोब नोकरी सोडली तरीही अनेक महिने ते काम करत होते असे दाखवण्यात आले.

• ओमकार सरवणकर यांनी काही महिने दहिसर जम्बो कोविंड सेंटर येथे एक्सरे टेक्निशियन म्हणून काम केले. त्यांनी आपल्या जबाबात असे स्पष्ट केले कि, आणेल कर्मचारी इथे काम करत नसताना ही अटेंडेन्स रजिस्टरमध्ये त्यांच्या खोट्या सह्या दाखवून त्यांची उपस्थिती दाखवण्यात आली.

• श्री. दिन महमद नुर महम्मद – यांचीही बोगस उपस्थिती व सह्या दहिसर कोविड सेंटरमध्ये खोट्या पद्धतीने दाखवल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे.

• डॉ. रुकासाना खातून यांना देखील अनेक महिने दहिसर सेंटर येथे कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले, त्यांच्या सह्या देखील खोट्या करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारताचा स्टार क्रिकेटर अफगाणिस्तानसाठी ठरणार हुकमी एक्का, World Cupसाठी मिळाली महत्त्वाची जबाबदारी

मतांसाठी हिरवी चादर, अफजल खान तुमचा पाहुणा लागतो काय?- Ashish Shelar

सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती – Jaynat Patil