शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; गणेश मारणे, विठ्ठल शेलारसह 16 जणांवर मोक्का

Sharad Mohol murder case:- पुणे शहर पोलिसांनी गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या कथित मुख्य आरोपी विठ्ठल महादेव शेलार (Vitthal SHelar) आणि दोन वकिलांसह त्याच्या 16 ‘सहकाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका)’ लागू केला आहे.

मोहोळची त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच  ५ जानेवारी रोजी कोथरूड येथील सुतारदरा येथील घराजवळील गल्लीत त्याचा सहकारी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह काही जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

शरद मोहोळ हत्याकांडातील शेलार आणि अन्य १६ आरोपींविरुद्ध मोक्का लावण्याचा प्रस्ताव एसीपी सुनील तांबे यांनी डीसीपी (गुन्हे) अमोल झेंडे यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे सादर केला होता. पुणे शहर पोलिस आयुक्त रतेश कुमार यांच्या निर्देशानुसार पोकळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली .

शेलार यांच्यावर यापूर्वी १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील उमराठी येथील प्रीत सिंग आणि शरद मोहोळचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा  गुंड गणेश मारणे (Gaja Marne) यांची या प्रकरणात वॉन्टेड आरोपी म्हणून नावे आहेत. त्यांचा शोध घेणे बाकी आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’, सावरकरांच्या पुस्तकाने मोठी खळबळ

शपथपत्र देऊन जात बदलता येते का? मंत्री छगन भुजबळ यांचा थेट सवाल

ओबीसी समाजावर मोठे संकट, मात्र भुजबळांच्या नेतृत्वात मोठी चळवळ उभी करणार – गोपीचंद पडळकर