Dagdusheth Ganapati | अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला (Dagdusheth Ganapati) आज ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहरी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली.

पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना (Dagdusheth Ganapati) देण्यात येणार आहे. आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती