आमच्या पक्षाचे काम कसे करावे हे आम्हाला दुसऱ्यांनी शिकवू नये; भाजप नेत्याने सेना नेत्याला सुनावले खडेबोल 

BJP Vs Shivsena मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत (District President of BJP Chetansingh Kedar-Savant) यांनी पक्ष वाढीसाठी व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव प्रत्येक निवडणूक ही कमळावर लढवण्याचा प्रयत्न करू अशी आशा व्यक्त केली होती. परंतु युतीचा धर्म न पाळता व अर्धवट माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी चुकीचे व बेजबाबदार वक्तव्य केल्याचे दिसून येते असे मत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार (BJP District Vice President Shashikant Pawar) यांनी नुकतेच प्रसिद्धी पत्रकार द्वारे व्यक्त केले.

भाजपा पक्षात नेहमीच राजकीय शिस्त पाळली जाते व आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व महाराष्ट्राचे भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व पक्षाचे वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनातूनच पक्षाचे काम करत असतो आणि पक्ष वाढीसाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार योग्य मध्य गाठून योग्य ते निर्णय घेत असतो. आमच्या पक्षाचे काम कसे करावे हे आम्हाला दुसऱ्यांनी शिकवू नये त्यांनी त्यांच्याच पक्षातील बाहेरची सोडा करमाळ्यातील गटबाजी कड लक्ष द्यावे व आपली प्रसिद्धी कामातून दाखवावी न कि बेताल वक्तव्यावरून कालच्या पत्रकार परिषदेत केवळ कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी आपण सर्व निवडणुका कमळ चिन्हावर लढण्याचा प्रयत्न करू व तसे मी आपल्या वरिष्ठांना विचारून त्यांच्या आदेशानुसार काम करू असे आश्वासन दिले.

लोकसभा उमेदवाराचे बोलायचे झाले तर आम्ही त्याचे उत्तर आमच्या कामातून व मताधिक्यातून देऊ. असे धमकी वजा इशारे युतीतील पक्षांनी देऊ नयेत. या वक्तव्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांच्याच वरिष्ठांकडून मागणार आहोत व त्यांना युती धर्म पाळण्याची समज देण्याचे सुचविणार आहोत असेही मत जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल:- Nana Patole

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?