चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?

Chandrakant patil ink attack : सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी रात्री सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर निळी शाई फेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासकीय नोकरभरतीचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण करण्याच्या धोरणाच्या निषेधार्थ एका संघटनेच्या कार्यकर्त्याने पाटील यांच्या अंगावर निळी शाई फेक करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली.

दरम्यान, अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाला जागेवर ताब्यात घेतले. या घटनेमुळे शासकीय विश्रामगृह परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. पालकमंत्री पाटील यांचे रात्री सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. त्यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता तरीही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अजय मैंदर्गीकर नावाच्या तरूणाने पोलिस सुरक्षा पार करून पालकमंत्र्यांना भेटताना त्यांच्या अंगावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला सोबतच त्याने काळा झेंडा दाखवत, भारतीय जनता पार्टी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

याआधी पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच पेटलं होतं. तर ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा