मीरा  बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

  Meera Borvankar  : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner) या पुस्तकामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. या पुस्तकात मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पोलीस दलातील कारकिर्दीतील अनुभव विशद केले आहेत.या पुस्तकातील एका माहितीने खळबळ उडवून दिली आहे.

येरवडा भूखंड लिलावाशी संबंधित ही माहिती आहे. हा भूखंड जबरदस्तीने विकल्याचं त्यांना या पुस्तकातून अधोरेखित करायचं आहे आणि या विक्रीमागे एक दादा मंत्री असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे.मीरा बोरवणकर यांच्या 288 पानांच्या या पुस्तकातून एका दादा मंत्र्याने आपल्याला येरवडा भूखंड लिलावाची प्रक्रिया पार पाडण्यास सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, हा दादा मंत्री कोण? त्याचे पूर्ण नाव काय? याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आलेला नाही. बोरवणकर यांनी थेट उल्लेख कुणाचा केला नाही मात्र यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

या मुद्द्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात, येरवड्याच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत तत्कालीन पालकमंत्री ‘दादा’ यांचा त्यासाठी दबाव होता असा उल्लेख केला आहे. बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे. या सरकारबद्दल पोलीस प्रशासनात तीव्र नाराजी आहे, फोन टॅपिंग प्रकरणाने प्रतिमा डागळलेल्या रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक बनवण्याचा घाट भाजपाच्या काही लोकांनी घातला होता. राज्यात काय चाललंय? असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित करत एखाद्या अधिकाऱ्याने घोटाळ्याबद्दल वक्तव्य केले तर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी कसली देता? जर तुम्ही काही केलेले नाही, तर घाबरता कशाला? असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा