“बाळासाहेबांना आयुष्यभर अपमानित करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मांडीवर घेतलं, जनता त्यांना माफ करणार नाही”

Uddhav Thackeray :- वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांना, कार्यपद्धतीला आयुष्यभर ज्यांनी विरोध केला, त्यांना सतत अपमानित केले त्यांनाच मांडीवर घेण्याचे पाप उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस गोड जात नाही. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवणे अशक्य आहे. येत्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.

उबाठा गटाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज समाजवादी पक्षातील परिवाराला एकत्रित आणून मुंबईतील एमआयजी क्लब मध्ये एकत्रित बैठक घेतली. त्याबद्दल पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता त्यांनी या युतीबाबत आपली भूमिका मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काल 40 वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक मुंबईत पार पडली. 2036 सालची ऑलिम्पिक स्पर्धा देशात आयोजित करायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मात्र असं असूनही उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय दिवस गोड जात नाही. हिंदुत्वाला तिलांजली देऊन उद्धव यांनी जेव्हा काँग्रेस पक्षाला मांडीवर घेतले तेव्हाच त्यांचा बेगडी हिंदुत्व लोकांना समजले. त्यांचा हा मुखवटा आगामी लोकसभा निवडणुकीत जनताच दूर केल्याशिवाय राहणार नाही.

सत्तेसाठी एकत्र आलेले हे सारे पक्ष याआधी 2014 आणि 2019 साली देखील एकत्र आले होते आणि त्यासाठीच ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व ज्यांनी सोडले, सत्तेच्या लालसेसाठी हिंदुत्वाचा विचाराला मतदान करूनही मतदारांचा विश्वसघात करून ज्यांनी असंगाशी संग केला त्याना आता जनताच त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्याप्रमाणे अन्नात भेसळ होते, त्याप्रमाणे हे सगळे पक्ष एकत्रित घेणे म्हणजे हिंदुत्वात मिलावट करण्याचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाचे हे नकली मुखवटे आगामी निवडणुकीत जनता फाडेल आणि यांना यांची जागा नक्की दाखवेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

घरी बसून काम करणाऱ्यांना लोकं मत देत नाहीत, जो लोकांमध्ये मिसळून त्यांची कामे करतो त्यालाच लोकं मतं देतात. त्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन कितीही प्रयत्न केले तरीही 2024 साली पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच बहुमताने निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली, त्यांना मांडीवर घेणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाहीत एवढंच नाही तर खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील त्यांना कधी माफ करणार नाहीत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे – पटोले

भाजपा आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसच आरक्षणाचा प्रश्न सोडवेल:- Nana Patole

चंद्रकांत पाटलांवर सोलापुरात शाईफेकीचा प्रयत्न, भाजपाविरोधात घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?