‘नागपूरमध्ये काँग्रेसनं पोरखेळ केला,हा विजय बावनकुळे यांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचं फळ’

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

दरम्यान, या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकानं विजयी झाले. भाजपची मत एकत्र ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो. महाविकास आघाडीची मत मिळवण्यात बावनकुळे यशस्वी झाले. अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

तर, अकोल्याचा विजय अद्वितीय आहे. वसंत खंडेलवाल यांनी तीन वेळचे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचं फळ आहे. नागपूरमध्ये काँग्रेसनं पोरखेळ केला. चिन्हावरचा उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत पडलं आहे. त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेला उमदेवार पराभूत झाला. राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेली जागा बिनविरोध केली पण काँग्रेसनं धुळे मुंबईवर आमची बोळवण केली. असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

हे देखील पहा