Ravindra Dhangekar | मोदीजी, वाढत्या महागाई, बेरोजगारीवर आपण गप्प का? काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांचा सवाल

Ravindra Dhangekar | महागाई का कमी केली नाही, यावर ‘ते’ बोलणार नाहीत. बेरोजगारी का वाढतेय, याकडे ‘ते’ दुर्लक्ष करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत, असे विचारल्यानंतर ‘ते’ कानावर हात ठेवतात. महिलांवर अत्याचार का वाढले आहेत, असे म्हणल्यानंतर ‘ते’ डोळे बंद करतात. असे हे अंधे-मुके आणि बहिरे सरकार आपण गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे. असे सरकार देशातील जनतेला नकोय, असे अशी खरमरीत टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदी यांच्या भाषणात नवीन काहीही नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचे भाषण पूर्ण होत नाही. विकासावर ते बोलत नाहीत.वाढत्या महागाई, बेरोजगारीवर गप्प राहतात. वर्षाला २ कोटी रोजगार देवू, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देवू, सर्व टोल नाके बंद करू, पेट्रोल, गॅस स्वस्त करू… अशी खोटी आश्वासने देवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली आहे.

केंद्र सरकारने पन्नास रुपयांचे पेट्रोल ११० रुपयांवर नेले. ४०० रुपयांचा गॅस १२०० रुपयांवर नेला. त्यामुळे सर्वसामान्यांना काय हाल सोसावे लागत आहेत, हे मोदींनी कधी रस्त्यावर उतरून पाहिले नाही. सभा घेणे, भाषणे ठोकणे म्हणजे लोकांमध्ये मिसळणे, असे होत नाही. गेल्या १० वर्षात ते एकदाही लोकांमध्ये मिसळले नाहीत. इतकेच काय या १० वर्षात एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. अनेक चॅनेल त्यांनी विकत घेतले असले तरी पत्रकारांच्या प्रश्नांना ते आजही घाबरतात, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?