उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; पाहा संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी

Mumbai – मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) कधी होणार? हा प्रश्न विरोधक आणि जनता उपस्थित करत असताना आता महाराष्ट्रात राजकीय लगबग वाढली आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. उद्या सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. यात २० पेक्षा अधिक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शपथविधीसाठीच्या हालचालींना देखील वेग आला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाल्याचं बोललं जात आहे. पाहूया संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी-

भाजप (BJP) छावणीतील संभाव्य मंत्री –चंद्रकांत पाटिल (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), गिरीश महाजन (Girish Mahajan), प्रवीण दरेकर (Praveen Darekar), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), रवि चव्हाण ( Ravi Chavan), बबनराव लोणीकार (Babanrao Lonikar), नितेश राणे (Nitesh Rane).

शिंदे गटातील संभाव्य मंत्री (शिंदे गटातील सर्व माजी मंत्री शपथ घेणार) – दादाजी भुसे (Dadaji Bhuse), उदय सामंत (Uday Samantha), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), बच्चू कडू (Bachchu Kadu), रवि राणा (Ravi Rana).

एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल महिनाभरानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार न केल्याने शिंदे यांचे सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आहे. मंत्रिमंडळ विस्तार न करण्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने (NCP and Congress) शिंदे सरकारवर वारंवार निशाणा साधला आहे.