Ajit Pawar | आढळराव पाटील हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व, अजित पवारांनी केले कौतुक

Ajit Pawar | लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. या निवडणुकीतून येणारा निकाल आपले भविष्य ठरवत असतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम लोकसभेच्या निवडणुकीतून आपल्याला करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला संसदेत पाठवायचा आहे. शिरूर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करायचे आहे असे आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ मोशी येथील गणेश बैंक्वेट हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख व बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा