Shivsena | शिवसेनेच्या महामेळाव्यात हजारो महिलांचा महासंकल्प..!!

आज शिवसेना (Shivsena) महिला आघाडीच्या भव्य जिल्हास्तरीय महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन हडपसर मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान येथे केले होते. पुणे जिल्ह्यातील लोकसभा महायुतीचे अधिकृत चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना नेत्या डॉ.नीलमगोऱ्हे अध्यक्षस्थानी होत्या. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या हजारो शिवसैनिक महिला (Shivsena) पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांचा राजकीय व समाजिक सहभाग वाढविणे गरजेचे आहे. तसेच स्वतःच्या हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल अधिक जाणकार होण्यासाठी समाज माध्यम व तंत्रज्ञानाचा शिकाऊ वृत्तीने वापर करणे आवश्यक आहे जेणेकरून महिला आपले प्रश्न व समस्या अशा व यासारख्या मध्यवर्ती मेळाव्यात मांडू शकतील असे आवाहन नीलम गोऱ्हेंनी महिलांशी संवाद साधताना केले.

महिला सक्षमीकरणाचे महायुतीच सरकारचे धोरण असून राज्यातील महिला बचत गटांना एकनाथ शिंदे साहेबांनी दुप्पट अर्थ साहाय्य मंजूर केल्याचे यावेळी नमूद केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय