रोहित बाबा, कार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल ?   

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील (Balgandharva Theater) कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (NCP leader Vaishali Nagwade) यांना मारहाण करण्यात आली असा आरोप होत आहे.

दरम्यान, आता मारहाण  केल्याचा आरोप असणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात (Against BJP) गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Stataion) मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय.

दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य पातळीवरील भाजप नेत्यांना लक्ष्य केले. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच खालावला आहे. आता किमान महाराष्ट्राची संस्कृती (Culture) तरी घालवू नये. या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) साहेब आपण मोठे नेते आहात. किमान आपण तरी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्याल आणि आवराल अशी अपेक्षा होती. पण आपणच अशा प्रवृत्तीला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असाल तर हे दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कधीही न शोभणारं आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल ? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच ‘हात’ आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.