चर्चा तर होणारच! लावणी डान्सर गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर, सिनेमाचे नावही समोर

लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमीवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिका झाली आहे. मात्र लावणीची आवड असणाऱ्या लोकांमध्ये गौतमी पाटील म्हणजे लोकप्रिय चेहरा आहे. नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या गौतमी पाटीलबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. ती लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे समजत आहे.

गौतमी पाटील लवकरच चित्रपटांमध्ये
गौतमी पाटील कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता ती लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वत:च्या तालावर नाचणारी आणि नाचवणारी गौतमी पाटील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचे चाहते तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. तरुणांना आपल्या दिलफेक अंदाजाने वेड लावणाऱ्या गौतमीने ही गोड बातमी स्वत: तिच्या चाहत्यांना दिली आहे. आलेल्या माहितीनुसार गौतमी ‘घुंगरु’ या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. तिला काही दिवसांपूर्वीच ही ऑफर आली होती असं खुद्द गौतमीनं सांगितलं.

तिनं एका कार्यक्रमात आगामी चित्रपटाविषयी सांगितले की, “लवकरच माझा घुंगरु नावाचा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मी कोणती व्यक्तीरेखा साकारणार आहे ते मी आता सांगू शकत नाही कारण आता सांगितल्यास तुमचा चित्रपटाला घेऊन जो उत्साह आहे तो कमी होईल म्हणून हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात येऊन पाहावा” असं मला वाटते.

हा चित्रपट लोककलावंत आणि माझ्यासारख्या कलाकांराच्या जीवनाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. लवकरच शूटींग संपेल आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट पाहण्यासाठी नक्की यावे असं आवाहन तिनं लोकांना केले आहे.