‘…तर हात तोडून हातात देईन’, राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांना मारहाणीनंतर सुप्रिया सुळेंचा इशारा

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील (Balgandharva Theater) कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (NCP leader Vaishali Nagwade) यांना मारहाण करण्यात आली असा आरोप होत आहे.

दरम्यान, आता मारहाण  केल्याचा आरोप असणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात (Against BJP) गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Stataion) मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय.

दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या मारहाणी विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात या मारहाणीच्या घटनेचा निषेध करताना म्हणाल्या की, भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीला मारलेलं तुम्ही पाहिलं ? ही महाराष्ट्राची मराठी संस्कृती आहे का ? हा शाहू, फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यांनी नेहमी महिलांचा मान-सन्मान केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगते की, आजच्यानंतर जर महाराष्टात कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेवर अंगावत हात उगारण्याचा प्रयत्न केला. तर मी स्वत:त तिथे जाईन आणि त्याच्याविरोधात कोर्टात केस करेन आणि त्याचे हात तोडून हातात देईन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.