सनातन धर्माच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या उदयनिधीच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडे तक्रार दाखल

Udayanidhi : INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.उदयनिधीने शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.असं वक्तव्य करत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविरोधात चिथावणीखोर, प्रक्षोभक आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 153A, 295, आणि 504 आणि IT कायद्याच्या कलमांचा समावेश आहे. याशिवाय हिंदू सेनेने उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या 200 रुपयांनी स्वस्त होणारे गॅस सिलिंडर खरोखरच बहिणींसाठी रक्षाबंधन भेट ठरेल का?

Sanatan Dharma : इंडिया आघाडीतील नेता बरळला; सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली

सत्तेसाठी गेलो नाही लोकांच्या विकासासाठी आम्ही सत्तेत गेलो –  Sunil Tatkare