Ajit Pawar group | छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज, मतभेदाच कारण आहेत सुनेत्राताई; वाचा सविस्तर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) नेते प्रफुल पटेल हे लोकसभेवर खासदार म्हणून गेल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. आज राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र यामुळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी 11 ते 12 जण इच्छूक आहेत. यात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar), बाबा सिद्दिकी, छगन भुजबळ, आनंद परांजपे इच्छूक आहेत. मात्र अजित पवार (Ajit Pawar group) राज्यसभेसाठी इतर नेत्यांना डावलून त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना प्राधान्य देत आहेत. मात्र राज्यसभेच्या उमेदवारीवरुन छगन भुजबळ नाराज असल्याच समजतय. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणं छगन भुजबळ यांना फारस पटलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप