चित्रा वाघ तुम्ही संजय राठोडांना राखी बांधा, टीका थांबवा अन्यथा…; बंजारा समाजाचा इशारा

वाशीम – मंत्रिमंडळात (Cabinet Expansion) संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा समावेश झाल्यानं भाजप नेत्या चित्र वाघ यांनी टीका करत आपल्याच सरकारला घराचा आहेर दिला. त्यानंतर आता चित्र वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात बंजारा समाज आक्रमक झालाय. बंजारा समाजाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. चित्र वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, असेही आवाहन समाजाने केलंय.

वाघ यांनी दोन दिवसात राठोड यांच्यावरील टीका थांबली नाही तर दोन दिवसात बांजरा समाज रस्त्यावर उतरेल. भाजप (BJP) नेत्यांनी जे संजय राठोड यांच्यावर जे आरोप केले ते संपूर्णतः खोटे आहेत. याचा संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो. जर दोन दिवसात आरोप बंद नाही झाले तर आम्ही इथून आदेश काढू, असा कडकडीत इशाराच त्यांनी दिला आहे.

चित्रा वाघ तुम्ही बुद्धिमान असाल तर उद्या रक्षाबंधन आहे. उद्या जाऊन संजय राठोड यांच्या हाताला राखी बांधा. बंजारा समाज तुम्हाला माफ करेल आणि चित्रा वाघ शांत झाल्या तर हे थांबेल नाहीतर उद्रेक होईल, आमच्या नेत्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असा इशारा या पत्रकार परिषदेतून देण्यात आलाय. टीव्ही-9ने  याबाबत वृत्त दिले आहे.