Sanjay Raut | ‘नवीन गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय’; संजय राऊतांचं पीएम मोदींना जोरदार प्रत्युत्तर

Sanjay Raut | महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहेत. जे घर अस्थिर करतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एका नेत्यांमुळे आज राज्य अस्थिर झाले आहे. सुमारे 45 वर्षांपूर्वी 1995 मध्ये देखील त्यांनी शिवसेना – भाजपच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. केवळ राज्य नव्हे तर आपला पक्ष देखील यांनी अस्थिर केला. त्यामुळे राज्याचे अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.

आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे. हा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे मराठी माणसाचे शत्रू आहेत, असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षांपासून भटकत आहेत. ज्यांना महाराष्ट्राने गाडले असे सगळे आत्मे भटकत आहेत.

हा नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय आहे. पण भाजपाचा अंतिम संस्कार महाराष्ट्रातच होईल. या भुताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्राने अंधश्रद्धा फेकाफेकी यांना कधीही महत्त्व दिलं नाही. महाराष्ट्र पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. काल मोदी पुण्यात होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तरी त्यांनी केला का? आंबेडकरांवरती भाजपला राग आहे. संविधान त्यांना बदलायचे आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आंबेडकरांचे संविधान त्यांना बदलायचे आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन