‘तो कोणाचाही आदर करत नाही…’, श्रीशांत-गंभीर मैदानात भिडले, झाली जोरदार हाणामारी VIDEO

Sreesant And Gambhir Fight: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) टीम इंडियाचे दोन सीनियर खेळाडू एकमेकांशी भिडले आणि आता ही लढत सोशल मीडियापर्यंत पोहोचली आहे. इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि गुजरात जायंट्सचा श्रीशांतमध्ये मैदानावरच भांडण झाले, त्यानंतर खेळाडू आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. आता एस. श्रीशांतने त्याच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये आपली बाजू मांडली असून या लढतीची संपूर्ण कहाणी उघड केली आहे.

एस. श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितले की आमचा सामना खूप छान चालला होता, पण मैदानावर आमचा साथीदार गौतम गंभीरने असे काही शब्द म्हटले ज्याची पुनरावृत्ती करणे खूप कठीण आहे. तो (गौतम) वीरू भाईसारखा वरिष्ठ खेळाडू असला तरी कोणाचाही आदर करत नाही. आजही तो माझ्याशी उद्धटपणे वागत होता, मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे आणि मला अजूनही तुमच्या आधाराची गरज आहे.

इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात गौतम गंभीरने श्रीशांतच्या षटकात आक्रमक क्रिकेट खेळले होते. गंभीरने श्रीशांतवर सातत्याने हल्ला केला, त्यानंतर एस. श्रीशांत काही बोलला आणि मग दोघांमध्ये बाचाबाची झाली. गंभीरनेही श्रीशांतला प्रत्युत्तर दिले आणि बाचाबाची अशीच सुरू राहिली, त्यानंतर हा वाद आणखी वाढला. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंडिया कॅपिटल्सने हा सामना 12 धावांनी जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंडिया कॅपिटल्सने 223 धावा केल्या ज्यात कर्णधार गौतम गंभीरच्या 51 धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्स संघ केवळ 211 धावा करू शकला. या संघातर्फे ख्रिस गेलने 9 चौकार आणि 4 षटकारांसह शानदार 84 धावा केल्या.

याआधीही श्रीशांतचे सामन्यादरम्यान अनेकदा भांडण झाले आहे. आयपीएल दरम्यान त्याची आणि हरभजन सिंगमधील लढत सगळ्यांनाच आठवते, जेव्हा सामना संपल्यानंतर भज्जीने श्रीशांतला थप्पड मारली आणि श्रीशांत रडल्याचे चित्र सर्वांसमोर दिसले होते.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम