Chitra Wagh | चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा…; ठाकरे गटाच्या जाहिरातीतील अभिनेता आक्रमक 

Chitra Wagh | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या “वॉर रुकवादी पापा” जाहिरातीतील अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी  भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

“मी एक चारित्र्यवान कलावंत आहे आणि एका कलावंताचा अपमान केला म्हणून भाजपा नेता चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी अन्यथा मी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करेन ” अशी भूमिका अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी व्यक्त केली.  आज समाजमाध्यमा वर व्हिडीओ द्वारे त्यांनी भूमिका मांडली.

ते म्हणाले,  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या एक सुशिक्षित महिला आहेत.  कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो हे त्यांना माहीत असावे .आज त्यांनी माझ्या एका वेबसिरीज च्या भूमेकेतील फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो आणि माझ्या अभिनयाला पॉर्न स्टार ची उपमा देऊन माझी अब्रू नुकसानी केल्याचा आक्षेप त्यांच्यावर घेतो. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे त्यामुळे त्या जाहिराती करणारा कलावंत पॉर्न स्टार असल्याचा शोध त्यांनी लावला.  जे फोटो त्यांनी प्रेस कॉन्फरेन्स मध्ये दाखवले ते माझ्या एका वेब सिरीज मधले आहेत आणि ते त्या भूमिकेचा एक भाग होता.  चित्रा वाघ यांनी विनाकारण माझ्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे.केवळ आपल्या राजकीय स्वार्था साठी त्यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे. असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ramdas Athawale | कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, रामदास आठवलेंची ग्वाही

Ravindra Dhangekar | आता जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नकोय, धंगेकर यांची मोदीं सरकरावर टीका

Devendra Fadnavis | …तुम्ही कफन चोर आहात, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल