हाऊस वाइफ ते पंचक्रोशीतील एकमेव महिला मेकॅनिक

महिलांसाठी काम करणं आता बरचं सोप्पं झालं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत आणि त्या उत्तम काम करत आहेत. आज खेड्यात जरी पाहिलं तर सहज महिला दुचाकीवर फिरतात, चार चाकी चालवितात, छोटी मोठी दुकाने देखील चालवितात. पण तरी देखील अशाच काही महिला आहेत, ज्यांना अगदी छोट्यात छोट काम बाहेर पडून करणं शक्य होत नाही. या आहेत हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील जयश्री गोविंद आंभोरे .

जयश्री या अनेकवर्ष हाऊस वाइफ होत्या पण आता त्यांनी त्यांची एक नवीन ओळख निर्माण केली आहे, ती ओळख म्हणजे पंचक्रोशीतील पहिल्या महिला मेकॅनिक. जयश्री मागील आठ वर्षांपासून मोटर दुरुस्त करणे, मिक्सर नीट करणे, असे काम करतात. त्यांना पंचक्रोशीत महिला मेकॅनिक म्हणून ओळखले जाते. जयश्री यांचे पती देखील हेच काम करतात. त्या म्हणातात अनेक लोक मला विचारतात तुम्ही कसं काय हे काम करता? तुम्हाला कसं जमतं.

मी त्यांना सांगते मला माझ्या नवऱ्याने शिकवलं आहे. आपल्या नवऱ्याला त्यांच्या कामात हातभार लावला तर काय झालं , पण काही लोकांना हे आवडायचं नाही, बायकांनी घर संभाळाव जर जास्तच वाटतं असेल तर शेतात काम करावं पण हे असं काम करू नये. पण हळू हळू लोकांना पटू लागलं आहे.

खेड्यात अजून देखील महिलांचा संघर्ष संपलेला नाही. पण मला हेक काम मनापासून आवडतं. एकदी मशीन दुरुस्त केली की चार पैसे मिळतात. तेव्हा फार आनंद होतो. आता छोट्या-छोट्या कामासाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागत नाहीत. घराला देखील हातभार लागतो. आम्ही दोघे मिळून हा व्यवसाय चालवितो.प्रत्येक महिलेने स्वताच्या पायांवर उभा राहिला हवे. काम करायला हवं, कष्ट करायला हवीत.