Amol Kolhe | शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात बॅनर, सुज्ञ मतदारांनी विचारले थेट प्रश्न

Amol Kolhe: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) निमित्ताने शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघात वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासमोर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे तगडे आव्हान आहे. या मतदारसंघात लक्ष्यवेधी लढत होणार असल्याची चिन्हे असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघावर आहे.

एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा मतदारसंघात फिरकलेच नाहीत असा आरोप अमोल कोल्हे यांच्यावर नागरिकांकडून होत आहे. या आरोपांमुळे कोल्हे हे अडचणीत आले असताना आता शिरुर मतदार संघात आंबेगावमध्ये लागलेल्या या बॅनरची चर्चा पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आले आहे.

विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला? असे तीन मोजके पण मार्मिक प्रश्न विचारण्यात आले आहे. खासदार साहेब उत्तर द्या, एक सुज्ञ नागरिक असे त्या बॅनरवर म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका