कॉंग्रेसचा नेहमीप्रमाणे गोंधळ सुरूच; विरोधीपक्षनेते पदाचा पेच कायम 

मुंबई : अधिवेशन सुरु होऊन जवळपास आठवडा होत आला तरीही कॉंग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे गोंधळ सुरु असल्याने विरोधीपक्षनेता नसल्याचे चित्र आहे. मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नव्या विरोधी पक्ष नेत्याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

सध्या कॉंग्रेसकडे संख्याबळ सर्वाधिक असल्याने विधानसभेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचे दिसत आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक आहे त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या  44 जागा असलेला काँग्रेस पक्ष हाच सर्वाधिक संख्या असलेला विरोधी पक्ष आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेता कॉंग्रेसचाच होणार असं दिसत आहे. काँग्रेसमध्ये नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा आहे.