PM-Kisan | पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ‘या’ दिवशी होणार वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम-किसान सन्मान (PM-Kisan) निधी योजनेंतर्गत 9 कोटी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात, 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करणार आहेत. कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

गेल्या 10 वर्षांत 11 कोटी शेतकऱ्यांच्या (PM-Kisan) खात्यात 3 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असं चौहान म्हणाले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवली आहेत. ग्रामविकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चौहान यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर काम सुरू केलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप