Eknath Shinde | आनंद दिघे यांच्या बहिणीला पॅरालिटीक अटॅक,सर्व कामे सोडून शिंदे रुग्णालयात पोहचले 

Eknath Shinde | शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरूणा गडकरी यांना पॅरालिटीक अटॅक आल्याने त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याची सूचना शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी   यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येत आणि सुरू असलेले औषधोपचार  यांच्याबाबत माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टराना केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप