Chitra Wagh | “शेवटी वळणाचं पाणी वळणालाच जातं…”, निलेश लंकेनी गुंडाची भेट घेतल्याने चित्रा वाघ यांची टीका

Chitra Wagh | अहिल्यानगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारला. निलेश लंके सध्या पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांनी गुरुवारी गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंच्या या भेटीवरुन भाजपाच्या नेत्यांनी त्यांना घेरले आहे.

भाजपाच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी लंके-मारणे भेटीवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी वळणाचं पाणी वळणालाच जातं…परवा या नवनिर्वाचित खासदार महोदयांच्या गुंडांनी एका गर्भवती भगिनीला पोटावर लाथा मारल्या, मारहाण केली, जातिवाचक शिवीगाळ केली. एका असहाय आणि दलित महिलेची विटंबना करणे, यालाच ते पराक्रम समजत असावे. म्हणूनच आज त्या पराक्रमी कृत्याबद्दल त्यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला असावा. कदाचित आपल्या तोडीस तोड नग असावा, म्हणून एका गुंडाकडून ते हा सत्कार स्वीकारताना दिसताहेतत, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी टोला मारला आहे.

पुढे खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या, त्यांच्या पक्षाच्या मोठ्ठ्या ताई राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून मगरीचे अश्रू ढाळताहेत. यावरूनच स्पष्ट होतं की, यांना ना त्या गर्भवती दलित महिलेच्या अब्रूची चाड, ना कायदा-सुव्यवस्थेचा आब, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप