Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल धाराशिवमध्ये होते. माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.  अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देखील अजित पवार हजर होते. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी अजित पवारांबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रचार सभेत सहभाग घेतला. यावेळी महायुतीचे सर्वच नेते उपस्थित होते.

दरम्यान, धाराशिव येथील ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे कडवे शिवसैनिक असून गेल्या पाच वर्षात त्यांनी चांगला जनसंपर्क तयार केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर आमने-सामने होते. या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे जेव्हा ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ओमराजे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला