मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यावरच निधी दिला जातो; आशिष जैस्वाल यांचे खळबळजनक आरोप 

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi government) प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान,  एका बाजूला महाविकास आघाडीसाठी एक एक मत महत्वाचे असताना आता काही आमदार आपल्या मनात साठवून ठेवलेल्या भावनांना मोकळी वाट करून देत आहेत. यातूनच आमदार आशिष जैस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांनी राज्यातील मंत्र्यांवर अतिशय गंंभीर आरोप केले आहेत. काही मंत्री आमदारांना टक्केवारी मागतात, असा थेट आरोप जैस्वाल यांनी मंत्र्यांवर केला आहे. मात्र, हे मंत्री नेमके कोणते जे आमदारांना टक्केवारी मागतात यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे.

जैस्वाल यांच्या आरोपांनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची देखील शक्यता आहे. जैस्वाल हे फक्त मंत्र्यांवर आरोपच करून थांबले नाहीतर त्यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे देखील सांगितले आहे. आमदार या सरकारच्या विरोधात जाऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला आहे. मतदारसंघाला न्याय मिळायला पाहिजे. निधीचा असमतोल आम्ही कधीही सहन करणार नाही. मंत्र्यांना आर्थिक मोबदला (Financial compensation to ministers) दिल्यावरच निधी दिला जातो असेही, जैस्वाल बोलताना म्हणाले आहेत.