शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवावा – विक्रांत पाटील

पुणे – शिक्षणमंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा. अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील (Bharatiya Janata Yuva Morcha State President Vikrant Patil) यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, परीक्षा संपूर्ण डीस्क्रीप्टिव घ्यायच्या होत्या तर मग मे महिन्यात का नाही घेतल्या? तसे झाले असते तर जुलै महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता आले असते!परंतु कोणत्याच प्रकारचे नियोजन शिक्षण मंत्र्यांनी केले नाही आणि आता सर्व विषय कुलगुरूंच्या अंगावर ढकलण्याचे काम उदय सामंत करीत आहेत.

वाढता कोरोना प्रभाव (Increasing corona effect),ऐन पावसाळ्यात अनेक ठिकाणी उद्भवणारी पूर सदृश परिस्थिती यावर परीक्षांच्या अनुषंगाने शिक्षण मंत्र्यांनी कोणती पूर्व उपाययोजना केली आहे याचे ही उत्तर विद्यार्थी मागत आहेत. लवकर परीक्षा घेऊन लवकर निकाल लावायचे असतील व नवीन शैक्षिणक वर्ष लवकर सुरू करायचे असेल तर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घ्याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांबरोबर संघर्षात भारतीय जनता युवा मोर्चाला रस्त्यावर उतरावे लागेल!