शिंदेंनी हे पाऊल उचललं नसतं तर शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना संपवली असती – कदम

मुंबई – विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे.

यातच आता शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam News) यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजितदादा पडलेल्या आमदारांना बोलावून आमच्या मतदारसंघात पैसे देताहेत. आणि आम्हाला निधी मिळत नाही. प्रत्येक आमदार हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुणाला भेटत नव्हते. एकनाथ शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही केला. पण उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील (Sharad Pawar) प्रेम काही कमी होत नव्हतं.

मी एकनाथ शिंदेंचे आमदार मानतो. 51 आमदारांचे आभार मानतो, 12 खासदारांचे अभार मानतो. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानतो. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर शरद पवार आणि अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेना (Shiv Sena) संपवली असती, असा दावाही त्यांनी केला.