Ajit Pawar : राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
आळंदी येथे शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार बोलत होते. यावेळी संवाद मेळाव्यास महायुतीचे घटक मित्र पक्षांचे पदाधिकारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
“तीर्थक्षेत्र देहू आळंदीच्या विकासाबरोबर पालखी महामार्गाची विकासकामे मार्गी लावली आत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर केली जाईल. ही देशाची निवडणूक असल्याचे आढळराव पाटील यांना निवडून द्या, येथील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल”, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Ravindra Dhangekar | पुण्याची निवडणूक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या हाती