House lizard | डोक्यावर पाल पडणे अशुभ की फार शुभ?

उन्हाळ्याच्या हंगामात लोकांच्या घरात पालीचा (House lizard) वावर वाढू लागतो. पाल ही सहसा घरा्या भीतींवरच चिटकून राहते. लाईटचे किडे खाण्यासाठी पाल बाहेर निघत असते. अनेकांना या पालीची खूप भीती वाटते. कधीकधी काही कारणांमुळे पाल खाली पडते. जर कुणाच्या अंगावर पाल पडली तर लोक लगेच अंगोळ करतात. कारण पाल अंगावर पडणे अशुभ मानले जाते. मात्र जर तुमच्या डोक्यावर पाल पडली तर त्याचा अर्थ काय आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या डोक्यावर पाल पडला तर ते खूप शुभ मानले जाते. म्हणजे तुमचा मान-सन्मान वाढेल.

शास्त्रामध्ये पाल (House lizard) हे लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे घरात पाल दिसली तर ते खूप शुभ लक्षण आहे. स्त्रीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला पाल पडली तर ते शुभाचे लक्षण आहे. तुमच्या पदात वाढ होईल. माणसाच्या उजव्या बाजूला पाल पडली तर तो भाग्यवान मानला जातो.

जर एखाद्याच्या डोक्यावर पाल पडली तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती संपत्ती आणि वैभवाने परिपूर्ण जीवन जगेल. त्याचबरोबर जर कधी पाल जमिनीवर पडला तर ते अशुभ मानले जाते. याचा अर्थ काहीतरी अप्रिय घडणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप