Ambati Rayudu | “फक्त सीएसकेला हरवून आयपीएल ट्रॉफी जिंकली जात नाही”, अंबाती रायुडूचा आरसीबीवर निशाणा

Ambati Rayudu | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे (आरसीबी) पहिले आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा स्वप्नच राहिले. आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात बेंगळुरूचा राजस्थान रॉयल्सने 4 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज अंबाती रायुडूचे (Ambati Rayudu) विधान समोर आले, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली.

रायुडूने आपल्या वक्तव्यात कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही परंतु आरसीबीवर निशाणा साधताना तो म्हणाला की, ट्रॉफी केवळ आक्रमकता आणि सेलिब्रेशनने जिंकली जात नाही. आरसीबीने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती. चेन्नईला पराभूत केल्यानंतर विराट कोहली आणि बंगळुरूच्या इतर खेळाडूंनी जल्लोष साजरा केला होका. या सेलिब्रेशनमध्ये किंग कोहली खूपच आक्रमक दिसत होता.

आता बेंगळुरूच्या पराभवानंतर रायुडू म्हणाला, “आयपीएल ट्रॉफी जल्लोष साजरा करुन आणि आक्रमकतेने जिंकली जात नाही. आयपीएल ट्रॉफी केवळ सीएसकेला हरवून जिंकली जात नाही. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला प्लेऑफमध्ये चांगले खेळावे लागेल.”

जर आपण किंग कोहलीबद्दल बोललो तर तो मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजवली आहे. त्याने 15 सामन्यांच्या 15 डावात 61.75 च्या सरासरीने आणि 154.70 च्या स्ट्राईक रेटने 741 धावा केल्या. कोहलीने 62 चौकार आणि 38 षटकार मारले. राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यातून कोहलीने आयपीएलमध्ये ‘आठ हजार’ धावाही पूर्ण केल्या होत्या. आयपीएलमध्ये 8 हजार धावांचा टप्पा पार करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप