Ravindra Dhangekar | अपघाताच्या संवेदनशील मुद्द्यावरूनही पुण्यात राजकारण सुरूच; धंगेकरांची फडणवीसांवर पुन्हा टीका

Ravindra Dhangekar | पुण्यातील हिट अँड रनच्या घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे काल थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे. मात्र विरोधक या अतिशय संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करू लागल्याचे चित्र आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी पुण्यात येवून कडक कारवाईचे निर्देश दिल्यानंतर देखील आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी फडणवीस यांच्यावर टीका करून राजकारण सुरूच ठेवले आहे.

धंगेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते. हा सगळा फार्स असू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचं समाधान करण्याकरता ते आले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला. पुणेकरांना दाखवणारा देखावा आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्या रात्री बरीच माया जमा केली आहे. पोलिसांनी चुकीचा तपास केला. पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. विशाल अग्रवाल हा बिल्डर डीफॉल्टर आहे. प्रचंड प्रमाणात पुणे महापालिकेत या बिल्डरकडून पैसे येणे आहेत. विशाल अग्रवालसह अनेक बिल्डर भाजपाबरोबर काम करतात. ते चुकीचं काम करतात म्हणून ते भाजपाबरोबर संलग्न आहेत. या लॉबीला देवेंद्र फडणवीस पाठिशी घालतात असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप