हैदराबाद : नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रा; गुढीपाडवा जल्लोषात साजरा

हैदराबाद/विनायक आंधळे : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा (Gudi Padwa). गुढीपाडवा हा एक भारतीय (India) सण असून तो हिंदू (Hindu) दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मित्रांंगण परिवारातर्फे (Mitrangan Parivar) हैदराबादमध्ये (Hyderabad) गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केला.

गुढीपाडवाच्या (Gudi Padwa) दिवशी मराठी बांधवांनी एकत्रित येऊन गुढी उभारून भव्य शोभायात्रेचे आयोजन मित्रांंगण परिवारातर्फे करण्यात आले होते. यावेळी, महिलांची बुलेट रॅली (Women’s Bullet Rally), फुगडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भव्य शोभायात्रेत ढोल, ताशा, लेझीम, टाळ, मृदंगच्या गजरात काठी खेळली जाते. याचबरोबर आपला पारंपारिक मल्लखांब (Mallakhamba) हा खेळ यावेळी सादर केला. यावेळी मराठी (Marathi) बांधवांनी वेगवेगळ्या वेशभूषेत दिसले, तर महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली.

शेभायात्रेनंतर विविध कार्यक्रम पार पाडले. यावेळी, मान्यवरांचे स्वागत, विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे मराठी बांधव, संस्था यांचा यावेळी गौरव करण्यात आला. आपले सण, उत्सव, परंपरा, संस्कृती (Culture) जपून सर्व मराठी लोकांना एकत्रित एकाच मंचावर आणणे हा मित्रांंगण परिवाराचा (Mitrangan Parivar) उद्देश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरिश लहानकर, विशाल फडके आदींनी परिश्रम घेतले.