Nitesh Rane | नेहमी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का, त्यांचा अग्रवाल कुटुंबांशी संबंध आहे का?

Nitesh Rane | कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आला असून त्याच्या पित्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एकीकडे या प्रकरणात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. कल्याणी नगर अपघात प्रकरणावरून आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे म्हणाले, नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सु्प्रिया सुळे गप्प का आहेत? अग्ररवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप