कंगना राणौतच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली – चित्रपट अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangna Ranaut) भाजप प्रवेशावर राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) म्हणाले की, तिचे स्वागत आहे. मात्र त्यांना पक्षाच्या प्रथेनुसार वागणूक दिली जाईल. पण आधी पक्षात या, मग काय द्यायचे ते ठरवू, असे आमचे मत आहे.

कंगना राणौत मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. शनिवारी एका कार्यक्रमाला उपस्थित असताना कंगनाने राजकारणात (Kangna Ranaut In Politics) येण्याची इच्छा व्यक्त केली. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लढवण्याबाबत बोलताना ती म्हणाली होती की, भाजपची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. यावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष म्हणजे कंगना राणौतने भाजपला पाठिंबा देऊन काँग्रेसला विरोध केला आहे. अशा स्थितीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना विचारण्यात आले की कंगना रणौतला भाजपमध्ये स्थान असू शकते का? त्यावर ते म्हणाले की, कोणत्या जबाबदारीवर काम करायचे, हा पक्ष ठरवतो.