उपकार्यकारी अभियंत्यावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

Crime News –  थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न वाडा तालुक्यातील वारेट येथे शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी घडला. वाडा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्यावर हा हल्ल्याचा प्रयत्न झाला असून त्यांच्या फिर्यादीवरून गणेशपुरी पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

किशोर यशवंत पाटील (राहणार वारेट, ता. भिवंडी) असे या प्रकरणी अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. अंबाडी शाखेंतर्गत वीजबिल वसुलीसाठी उपकार्यकारी अभियंता कटकवार, शाखा अभियंता मनोज देशमुख, वरिष्ठ तंत्रज्ञ सुधीर जाधव, संतोष शेलार, सुरक्षा रक्षक प्रदिप अधिकारी हे शुक्रवारी दुपारी वारेट गावात गेले. आरोपी किशोर पाटील याच्याकडे दोन वीज जोडण्यांची ७५ हजार रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू असताना आरोपीने कटकवार यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू समवेतच्या सहकाऱ्यांनी व आरोपीच्या कुटुंबियांने कटकवार यांचा बचाव केला.

या भ्याड हल्ल्यानंतरही न डगमगता कटकवार व त्यांच्या चमूने आरोपीच्या दोन्ही वीज जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करून गणेशपुरी पोलीस ठाणे गाठले. कटकवार यांच्या फिर्यादीवरून गणेशपुरी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा (कलम ३५३), शिवीगाळ व दमदाटी केल्याचा (कलम ५०४ व ५०६) गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

सणासुदीत कांद्याने केला वांदा, भाव गगनाला भिडले

मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार